HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

धर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मंत्रालयात धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली होती. धर्मा पाटील यांच्या आत्महत्यानंतर फडणवीस सरकारवर जोरदार टीका झाली होती. यानंतर राज्यातील राजकीय नेते मंडळींनी धर्मा पाटील यांच्या नावावर राजकारण केले. यानंतर धर्मा पाटील यांच्या चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश करत राजकारणार एन्ट्री केली होती.

दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच प्रवेश केला होता. एवढेच नाही तर नरेंद्र पाटील यांनी मनसेच्या तिकीटावर धुळ्यातून विधानसभा निवडणूकही देखील लढवली होती. मात्र, नरेंद्र पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच नरेंद्र पाटील यांनी मनसेला रामराम ठोकला आहे.

आज (२३ जानेवारी)  एका बाजुला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असलेल्या नवा झेंड्याचे अनावरण केले. मनसेचे मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये राज्यव्यापी महाअधिवेश सुरू आहे. तर दुसऱ्या बाजुला नरेंद्र पाटील यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

धर्मा पाटील यांनी का आत्महत्या 

धर्मा पाटील यांच्या पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात केवळ चार लाखाचा मोबदला औष्णिक वीज प्रकल्पासाठी वीज निर्मिती करणाऱ्या यंत्रणेने देऊ केला. मात्र हा मोबदला योग्य नसल्याने वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणाऱ्या यंत्रणेकडून दुजाभाव झाल्याचा आरोप करीत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी गेल्या  मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. धर्मा पाटील यांच्या चार एकर शेतात ६००आंब्याची झाड लागवड केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शेतात विहीरदेखील आहे. या प्रकल्पासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली.

Related posts

शरद पवार ‘माढा’ मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार ?

News Desk

स्वाभिमानी-आघाडीच्या नेत्यांची आज महत्वपूर्ण बैठक

News Desk

लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये जागावाटपवर शिक्कामोर्तब

News Desk