मुंबई । आज राज्यात कोरोनाबाधीत ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५ हजार ६४९ झाली आहे. ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२२ एप्रिल) दिली.
राज्यात आज 431 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 5649 अशी झाली आहे. यापैकी 789 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 22, 2020
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ५ हजार २१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९० हजार २२३ नमुन्यांपैकी ८३ हजार ९७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५६४९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९ हजार ७२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,०५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता २६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १०, पुणे येथे २, औरंगाबाद येथे २ तर कल्याण डोंबिवली येथे १, सोलापूर मनपा येथे १, जळगाव येथे १आणि मालेगाव येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १४ पुरुष तर ४ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर १२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १८ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या
- मुंबई : ३६८३ (१६१)
- ठाणे: २४ (२)
- ठाणे मनपा: १६६ (४)
- नवी मुंबई मनपा: १०१ (३)
- कल्याण डोंबिवली मनपा: ९७ (३)
- उल्हासनगर मनपा: १
- भिवंडी निजामपूर मनपा: ७
- मीरा भाईंदर मनपा: ८१ (२)
- पालघर: १९ (१)
- वसई विरार मनपा: ११५ (३)
- रायगड: १६
- पनवेल मनपा: ३५ (१)
- ठाणे मंडळ एकूण: ४३४५ (१०)
- नाशिक: ४
- नाशिक मनपा: ७
- मालेगाव मनपा: ९४ (९)
- अहमदनगर: २१ (२)
- अहमदनगर मनपा: ८
- धुळे: ५ (१)
- धुळे मनपा: ४
- जळगाव: ४ (१)
- जळगाव मनपा: २ (१)
- नंदूरबार: ७
- नाशिक मंडळ एकूण: १५६ (१४)
- पुणे: १९ (१)
- पुणे मनपा: ७३४ (५४)
- पिंपरी चिंचवड मनपा: ५२ (२)
- सोलापूर मनपा: ३० (३)
- सातारा: १६ (२)
- पुणे मंडळ एकूण: ८५१ (६२)
- कोल्हापूर: ६
- कोल्हापूर मनपा: ३
- सांगली: २६
- सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
- सिंधुदुर्ग: १
- रत्नागिरी: ८ (१)
- कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)
- औरंगाबाद:१
- औरंगाबाद मनपा: ३७ (५)
- जालना: २
- हिंगोली: ७
- परभणी मनपा: १
- औरंगाबाद मंडळ एकूण: ४८(५)
- लातूर: ८
- उस्मानाबाद: ३
- बीड: १
- नांदेड मनपा: १
- लातूर मंडळ एकूण: १३
- अकोला: ११ (१)
- अकोला मनपा: १०
- अमरावती मनपा: ७ (१)
- यवतमाळ: १८
- बुलढाणा: २४ (१)
- वाशिम: १
- अकोला मंडळ एकूण: ७१ (३)
- नागपूर: ३
- नागपूर मनपा: ९७ (१)
- गोंदिया: १
- चंद्रपूर मनपा: २
- नागपूर मंडळ एकूण: १०३ (१)
- इतर राज्ये: १७ (२)
एकूण: ५६४९ (२६९)
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.