HW News Marathi
महाराष्ट्र

‘शरद पवारांचा अनादर करणाऱ्या अध्यक्षांची दुकानदारी जनतेसमोर मांडणार’- दिलीप मोहिते पाटील

राजगुरूनगर | विविध प्रकारचा निधी देऊन सहकार्य करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार यांना संस्थेच्या वार्षिक अहवालात टाळल्याचा आरोप करून खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा अनागोंदी कारभार जनतेसमोर आणणार असल्याची टीका खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी केली. लोकांच्या पैशावर उभारलेल्या संस्थेचे गेल्या ४७ वर्षात कोणतेही भरीव कार्य नाही. उलट मालकी हक्क असल्याचा आव आणून या माध्यमातून काहींचे प्रपंच सुरु आहेत. याविरोधात विधानसभेच्या येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार साहेबराव बुट्टे पाटील यांचे पुत्र देवेंद्र बुट्टे पाटील व संचालक मंडळाविरोधात रविवारी (दि. ३) पत्रकार परिषदेत मोहिते बोलत होते. मालकी हक्क असल्याचा आव आणून या माध्यमातून काहींचे प्रपंच सुरु आहेत. याविरोधात विधानसभेच्या येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलांच्या लोकल प्रवासावर भाजपा गप्प का? नवरात्रीत मायभगिनींना लाभ झाला नसता का?रेल्वेमंत्री पियुष गोयल मुंबईच्या महिलांना उत्तर द्या.

News Desk

सरकारनं सात-बारा कोरा करण्याचा शब्द पाळला नाही – विखे पाटील

News Desk

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात तलाठी संघटना आक्रमक!

News Desk