HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणीचा रिपोर्ट येण्यापूर्वी त्यांनी मंत्रालयात हजेरी लावली होती. वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच इतर मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.

राज्यातील मंत्र्यांची आज (२९ ऑक्टोबर) मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील मंत्रालयात दाखल झाले. मात्र कॅबिनेट बैठकीपूर्वी त्यांच्या कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजले. यानंतर त्यांनी जराही वेळ न घालवता तातडीने घरी जाण्याचा निर्णय घेतला.दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. ते रुग्णालयात दाखल होणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकवर्तीयांनी दिली आहे.

तसेच, राज्यात मोठ्या मंत्र्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले अशा अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीवर दगडफेक करुन दंगल प्रकरणी  ६० जणा विरुद्ध गुन्हा दाखल

News Desk

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका !

News Desk

‘पेट्रोल दरवाढीच्या बदल्यात सुविधा मिळाल्यात’, सुजय विखे पाटलांची खोचक टीका

News Desk