HW News Marathi
महाराष्ट्र

दिग्दर्शक महेश मांजरेकरांना खंडणीसाठी फोन, दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई | अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशी चौफेर कामगिरी करणाऱ्या महेश मांजरेकर यांना काल (२६ ऑगस्ट)रात्री खंडणी मागणारा धमकीचा मेसेज मोबाईलवर आला. याबाबत दादर पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला. महेश मांजरेकर यांना गेल्या दोन दिवसांपासून धमकीचे मेसेज येत होते. त्यांना ३५ कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी केली जात होती. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या नावाने ही धमकी दिली जात होती.

मांजरेकर यांना ३५ कोटींची खंडणी मागणारा मेसेज आला, त्यांनतर त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आता या पुढील तपास गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक तपास करत आहे. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने तात्काळ रत्नागिरीतून एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचा अबू सालेमशी काही संबंध आहे का?, धमकी देण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कामाला गती देणार! –  तानाजी सावंत

Aprna

पुण्यात १५ नवे कोरोना पॉझिटिव्ह, पुण्यात एकूण आकडा १९०

News Desk

“त्या महिलेनेच अंगातील झगा काढला”, गृहमंत्र्यांनी जळगाव वसतिगृहात काय घडले ते सांगितलं

News Desk