HW News Marathi
महाराष्ट्र

‘रुपाली चाकणकरांना ओळखत नाही’, नवनीत राणांचं प्रत्युत्तर..!

अमरावती। नुकतचं राज्याचं दोन दिवसीय विधिमंडळ पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु असून टीका केली जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत ओबीसी आरक्षणावरुन झालेल्या गदारोळानंतर भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. मात्र या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांना राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली होती, तर रवी राणा यांच्या टीकेनंतर रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही चांगलाच निशाणा साधला होता “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले,” असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं असून रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर मिश्कीलपणे टीका केलीये.

नवनीत राणा चांगल्याच भडकल्या-

मी रुपाली चाकणकर यांना ओळखत नाही. मी शरद पवार, अजित पवार यांना ओळखते. त्यांनी काही म्हटल्यास त्याला उत्तर देईन. या दोन्ही नेत्यांचा मी आदर करते. त्यांनी काही म्हटलं आणि माझं चुकत असेल तर ती चूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ज्यांना मी ओळखतच नाही त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, असा टोला खासदार नवनीत राणा यांनी रुपाली चाकणकरांना लगावलाय. दरम्यान, नवनीत राणा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी एक चर्चा सुरु होती. मात्र, जातवैधता प्रमाणपत्राच्या वादावरुन नवनीत राणा अडचणीत सापडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच त्यांना दिलासा दिला आहे. याबाबत विचारलं असता मला फक्त दोनच वर्ष झाली आहे. मला अजून खूप काम करायचं आहे. तसंच आपण अपक्ष खासदार असल्याचंही नवनीत राणा यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्रातील नवनिर्वाचित मंत्र्यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाल्या होत्या रूपाली चाकणकर?

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी बबली निघाले”

रूपाली चाकणकर सातत्याने म्हणजेच संधी मिळेल तेव्हा नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र डागत असतात. पाठीमागच्या महिन्यात हायकोर्टाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करुन त्यांना दणका दिला. तर काल विधिमंडळ अधिवेशनात आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवला. हाच धागा पकडत घालत चाकणकर यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केलाय. “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी-बबली निघाले”, अशा शब्दात चाकणकर यांनी नवनीत आणि रवी राणांवर तोफ डागली होती.

मात्र या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांना राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. रवी राणा यांच्या टीका केल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही चांगलाच निशाणा साधला आहे. “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले,” असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं असून रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर मिश्कीलपणे टीका केलीये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५०० चौरस मीटरच्या जागेत शाळा सुरू करता येणार, खाजगी शाळांसाठी राज्य सरकारकडून नियमात दुरूस्ती

News Desk

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसलेंना ईडीचे समन्स

News Desk

मनसे-अ‍ॅमेझॉन वाद चिघळला, राज ठाकरेंना नोटीस देत दिंडोशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

News Desk