HW News Marathi
महाराष्ट्र

पवार-गडकरींमध्ये चर्चा तर गिरीश बापटांचं नितीन गडकरींना पत्र!

पुणे। देशाच्या राजकारणातील दोन बड्या नेत्यांची आज पुण्यात भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यात आज पुण्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे विमानतळाचा प्रश्न आता लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. तशी माहितीच भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी दिलीय. पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भातही यावेळी चर्चा झाल्याची माहिती बापट यांनी दिलीय. तसंच आपण एक पत्र नितीन गडकरी यांना गिरीश बापट यांनी यावेळी दिल.

लवकरच राजधानी दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली

दुसरीकडे शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात मुंबई-गोवा महामार्गाबाबतही चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिलीय. आजची बैठक फलद्रुप झाली. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न लवकरच निकाली लागेल, असं तटकरे म्हणाले. तसंच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आल्या होत्या. मात्र, त्यांनाही अशी मदत करता आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं निकष बदलून मदत करावी, अशी मागणी तटकरे यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार हे किवळ राजकीय भाष्य आहे, यामध्ये फारसं तथ्य नाही, असा दावाही तटकरे यांनी यावेळी केलाय.पुणे विमानतळासमोरील 12 एकर जागा मिळावी आणि कार्गोची तीन एकर जागा मिळण्याबाबतही आज शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यात चर्चा झाली आहे. नितीन गडकरी हे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष आहेत. लवकरच राजधानी दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी पुणे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती बापट यांनी दिली.

नव्या टर्मिनलचं 61 टक्के काम पूर्ण झालं

पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणाने 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. नव्या टर्मिनलचं 61 टक्के काम पूर्ण झालं असून 2022 पर्यंत ते वापरासाठी खुलं होईल, अशी माहिती दिली आहे. पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट रोजी विमानतळ प्राधिकरणाची बैठक पार पडली होती. त्यावेळी त्यांनी विमानतळ विस्तारीकरणाबाबत आढावा घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हे तर उशिरा सुचलेलं शहाणपण’, राज्य सरकारच्या अध्यादेशाच्या निर्णयावर भाजपची टीका!

News Desk

‘मुंबई हिंदुस्तान है’ रितेश देशमुखचं कंगणा राणावतला सणसणीत उत्तर!

News Desk

सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी 7 ते 9 ऑगस्टला राज्यव्यापी संप

News Desk