HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल परबांच्या निमंत्रणानंतर ST संदर्भात पडळकर, खोतांची सरकारसोबत चर्चा सुरू

मुंबई | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. “जोपर्यंत अधिकृतपणे सरकार काही बोलत नाही. नुसते सकारात्मक आहे. नुसते चर्चा सुरू, सरकार कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहेत. ही आता नुसती आश्वासने झाली. अधिकृतपणे सरकारच्या माध्यमातून काही येत नाही. तोपर्यंत आम्ही विश्वास कसा ठेवणार,” चर्चेच्या निमंत्रणानंतर पडळकरांनी सरकारला सवाल विचारला आहे. यानंतर पडळकर आणि खोत यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आज (२३ नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत.

“विलीनीकरण शक्य नसेल तर कर्मचाऱ्यांना घसघशीत पगार द्या,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी परबांनी दिला आहे. तसेच ताताडीनं एसटी संपावर तोडगा काढा, असे देखील पवार म्हणाले. “शरद पवारांनी एसटी संपासंदर्भात त्यांची काही भूमिका आहे. शरद पवार, अजित पवार आणि अनिल परबांशी काल (२२ नोव्हेंबर) चर्चा केली. पवारांनी एसटी संपासंदर्भात त्यांच्या बोलण्यातून मला असे वाटते की, काहीतरी तोडगा लवकरच निघेल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (२३ नोव्हेंबर) शरद पवारांशी वाय. बी. सेंटरमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हणालं.

मंत्रालयाला घेराव घालू – पडळकर

“मंत्र्यांना असे वाटत की, एसटी कर्मचारी हे आझाद मैदाना कोनवाड्यात ठेवल्या सारखे आहे. हे कुठे जातात. पण सरकारने असे काय समजायचं कारण नाही. आज, उद्याची आम्ही वाट बघू, नाहीत आम्ही मंत्रालयाला घाराणे घालायला (घेराव घालू) महाराष्ट्रातील सगळे कर्मचारी तयार आहेत. आतले मंत्री आत राहतील आणि बाहेरचे बाहेर राहतील. बाहेरचांना आत जाता येत नाही, आणि आतल्यांना बाहेर येता येणार नाही,” असे पडळकर बोलत होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुर्ला पूर्व द्रुतगती मार्गावर तणाव, नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक

News Desk

Axis बँकेवर ठाकरे सरकारची कृपा, अमृता फडणवीसांवर करत होते टीका

News Desk

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना अतिशय दुःखद,घटनेची चौकशी करून सरकार दोषींवर कारवाई करणार- छगन भुजबळ

News Desk