HW News Marathi
Covid-19

परळी वैजनाथ येथील महाशिवरात्र यात्रा उत्सव रद्द करीत असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांचे आदेश…

बीड | जिल्ह्यातील कोव्हीड विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चालू वर्ष सन २०२१ मधील ११ मार्च २०२१ रोजी पासून सुरु होणारी परळी वैजनाथ येथील महाशिवरात्र यात्रा उत्सव रद्द करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत.

गेल्या वर्षा पासून मोठ्या प्रमाणात कोविड-१९ साथ रोगाचा प्रादुर्भाव चालू आहे. कोरोना रोगाच्या अनुषंगाने परळी वै. तालुक्यामध्ये, शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोना पॉझिट रुग्णांची वाढत आहे.

तसेच वैजनाथ ज्योतिलिंगाचा महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीला भरणाऱ्या वार्षिक यात्रा लाखो भाविक दर्शन घेतात. यावेळी मंदिरात व शहरातून पालखी मिरवणक निघते. त्यावेळी खुप मोठ्या प्रमाणात भाविक या वेळी पालखीचे दर्शन घेतात यामुळे सोशल डिस्टन्सींग नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे.

महाशिवरात्र उत्सव ११ मार्च पासुन सुरु होत असून ५ दिवस चालू असतो. उत्सवानिमित्त तालुक्यातून व परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त देव दर्शनासाठी व महापुजेसाठी येतात. या अनुषंगाने तहसिलदार परळी यांनी कोरोनाप्रादुर्भावाच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून महाशिवरात्र यात्रा उत्सव रद्द करणे बाबत कळविले आहे.

या आदेशांचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सूचित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजू शेट्टींनी थेट साधला मुख्यमंत्री अन् शरद पवारांवर निशाणा

News Desk

राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्याने ओलांडला ९० हजारांचा टप्पा

News Desk

राज्यात कोरोनाचे २४६५ रुग्ण बरे होऊन घरी, एकूण रुग्ण संख्या १४ हजार ५४१ वर

News Desk