HW News Marathi
महाराष्ट्र

माझा वाढदिवस साजरा करू नये, मुख्यमंत्र्यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आदेश दिले आहेत. “२२ जुलै रोजी असलेला आपला वाढदिवस भाजपचे लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी कोणताही बडेजावपणा करून साजरा करू नये”, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. “माझ्या वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग, बॅनर्स, जाहिराती दिसणार नाहीत, याची भाजपच्या सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खात्री करावी”, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

“माझ्या वाढदिवशी कोणतेही जल्लोषाचे कार्यक्रम आयोजित करू नयेत. अथवा त्यांच्यावर पक्षाकडून रितसर कारवाई करण्यात येईल”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच “माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या कोणाला खर्च करण्याची इच्छा असेल त्यांनी तो निधी मुख्यमंत्री सहायता निधीत द्यावा”, असेही आवाहन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पांदणरस्त्यांची अधिकाधिक कामे होण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष प्रयत्न करावे! – ॲड. यशोमती ठाकूर

Aprna

नांदेडमधील होल्ला मोहल्ला कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांच्या गाड्या फोडल्या!

News Desk

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडूनही श्रद्धांजली

News Desk