HW News Marathi
देश / विदेश

अभिमानास्पद ! विदर्भाचा माणुस थेट स्कॅाटिश संसदेत झाला खासदार

स्कॉटलंड | संपुर्ण जगभरात भारतीय वंशाचे लोकं अनेक क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. परदेशात राजकारणातदेखील मोठ्या पदांवर काम करत आहेत. अमेरिकेच्या संसदेत बरेच भारतीय वंशाचे नेते आहेत. मोठमोठ्या जबाबदाऱ्या ते मोठ्या हुशारीने पेलताना दिसतात. अशाच देशात भारतीय माणसाने तिथल्या राजकारणात प्रवेश करून एक नवा इतिहास रचला आहे. हा देश आहे स्कॉटलंड.

स्कॉटिश संसदेत नुकत्याच आपल्या अमरावतीच्या डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांनी खासदार म्हणून शपथ घेतली आहे. स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत. डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांच्या यशाने महाराष्ट्रासह अमरावतीत मानाचा तुरा रोवला गेला आहे.संपूर्ण अमरावतीसह महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानाची एक गोष्ट आहे.

कोण आहेत डॉ. संदेश?

डॉ. संदेश हे मूळचे अमरावती शहरातले. भाजी बाजार या परिसरात त्यांचे घर आहे. प्रकाश आणि पुष्पा गुल्हाणे हे त्यांच्या आईवडिलांचे नाव. त्यांचे वडील प्रकाश लंडनमध्ये एका खाजगी कंपनीत अभियंता होते. लंडनमध्येच डॉ. संदेश यांचा जन्म झाला. ते २०११ साली लंडनहून स्कॉटलंडला स्थायिक झाले. सात वर्षे त्यांनी ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून काम केले. ते ग्लासगो येथे जनरल प्रॅक्टिशनर आहेत.

दरम्यान, त्यांनी कोव्हीड काळातही फ्रंट लाईनवर काम केले होते. ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या जनरल प्रॅक्टिशनर ट्रेनी कमिटीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. वैद्यकीय सेवेसोबतच त्यांना स्पोर्ट मेडिसिन या विषयात खूप आवड आहे. ते सध्या स्कॉटलंडच्या क्विन्स पार्क फुटबॉल क्लबचे मेडिसिन आणि सायन्स प्रमुखही आहेत.

स्कॉटिश राजकारणात प्रवेश

डॉ. संदेश यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होते. अशात त्यांनी स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला. २०२१ मध्ये त्यांना स्कॉटलंडच्या संसद निवडणुकीत ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती. स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह आणि युनियनिस्ट पार्टीकडून ते खासदार म्हणून उभे राहिले आणि जिंकलेही. नुकतेच त्यांनी स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथही घेतली. स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार ठरले आहेत. वयाच्या ३९व्या वर्षी त्यांनी हे साध्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात; युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू

Aprna

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, पाकिस्तानतून धमकीचा फोन

News Desk

केंद्र सरकारचा युर्टन, गैरहिंदी भाषिक राज्यांमध्ये आता हिंदी भाषा शिकविणे अनिवार्य नाही

News Desk