मुंबई | महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर आहेत. राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करावी या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सध्या सहा हजार रुपये विद्यावेतन मिळत असून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 11 हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या 2015 साली घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मुख्य मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Medical interns from all over #Maharashtra have started an indefinite strike, demanding a hike in their stipend from the state government. The medical interns in Maharashtra are being paid a stipend of Rs 6000 per month
— ANI (@ANI) June 12, 2018
असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्सने १३ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मध्यरात्रीपासून हे डॉक्टर संपावर गेले आहेत. ऐन पावसाळ्यात हे डॉक्टर्स संपावर गेल्याने त्याचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.