HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांवरची शस्त्रक्रिया यशस्वी; डॉक्टरांची माहिती

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांना मान आणि मण्याच्या दुखण्यामुळे त्रस्त होतं. यानंतर मुख्यमंत्र्यांना काल (११ नोव्हेंबर) गिरगावातील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. आज (१२ नोव्हेंबर) सकाळी मुख्यमंत्र्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दिवाळीपुर्वी उद्धव ठाकरेंना पाठ तसेच मानदुखीचा मोठा त्रास होत होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अनेक कार्यक्रमदेखील रद्द केली होती. ठाकरेंनी गिरगावच्या रिलायन्स फाउंडेशन या रुग्णालयात आपली तपासणी केली असून, त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

आंदोलक ST कर्मचाऱ्यांसाठी संदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आंदोलक ST कर्मचाऱ्यांना एक आवाहन केलं आहे. “ST कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.अशा परिस्थितीत , कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. अशी हात जोडून विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

 

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ड्रग्जचं व्यसन लागलेल्यांना अटक न करता व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा -आठवले

News Desk

रेल्वे प्रशासनाचा सर्वात मोठा निर्णय, मुंबईची लोकल ट्रेन ३१ मार्चपर्यंत बंद

swarit

खडसेंना पुन्हा कोरोनाची लक्षणे, ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाणार?

News Desk