HW News Marathi
Covid-19

खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांचे Prescription आवश्यक नसणार

मुंबई | कोरोना चाचणीवरून अनेक वाद निर्माण होत असताना आता पालिकेने नवे नियम लागू केले आहेत. खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक नसल्याचे मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या व्यक्तीला आता थेट चाचण्या करणे शक्य होणार आहे. आत्तापर्यत खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यासाठी डॉक्टरची चिठ्ठी बंधनकारक होती. त्यामुळे अनेक वादही निर्माण झाले होते.

मात्र, पालिकेच्या नव्या नियमानुसार, कोरोनाची लक्षणे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला खासगी प्रयोगशाळेत विनाचिठ्ठी चाचण्या करता येणार आहेत. तसेच, प्रयोगशाळेत पोहोचू न शकणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती किंवा इतर आजारांच्या व्यक्तींच्या चाचण्या घरी जाऊन करण्याची मुभाही पालिकेने खासगी प्रयोगशाळांना दिली आहे.

कोरोनाच्या निदानासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या आणि पुरेसे संचही उपलब्ध असल्याने अधिकाधिक चाचण्या केल्या जाव्या यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. खासगी प्रयोगशाळांवरील नियमही शिथिल करत चाचण्या खुल्या कराव्यात असे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिले आहेत. यानुसार, चाचण्या करण्याबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासंबंधीची बैठक काल (६ जुलै) झाली असून लवकरच सुधारित नियमावली जाहीर केली जाणार आहे.

मोफत चाचण्या करण्यासाठी मात्र रुग्णांना पालिकेच्या बाह्यरुग्ण विभागात तपासणी करावी लागणार आहे. त्यानंतरच चाचण्या केल्या जातील, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, विलगीकरण केंद्रामध्ये असलेल्या रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींची देखील घरी जाण्यापूर्वी चाचण्या केल्या जाणार आहेत. यासाठी प्रतिजन चाचण्या उपलब्ध केल्या आहेत, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनमध्ये राज्यात आतापर्यंत तब्बल ६९ हजार गुन्ह्यांची नोंद

News Desk

राज्यात ‘म्युकरमायकोसिस’चे १५००च्या आसपास रुग्ण, राजेश टोपेंच्या केंद्राकडे ३ महत्वाच्या मागण्या

News Desk

“कोरोनाचा म्हणूनच प्रादुर्भाव वाढला”, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर पुन्हा हल्लाबोल!

News Desk