HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांचं नाव घ्यायची यांची लायकी आहे का? हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांवर संतापले!

मुंबई। गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे. यातच त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आणखी काही आरोप केले आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, मला सोमय्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एकदा तक्रार केली आहे. मग त्या तपास यंत्रणा तपास करतील की, तुम्ही कशाला पर्यटन करायला जाता? तुरुंगात टाकणार, घोटाळेबाज असं म्हणण्याचा अधिकार यांना कोणी दिला?

आमच्यावर आत्तापर्यंत एकही घोटाळ्याचा आरोप झालेला नाही

यावर आक्षेप घेत मी उच्च न्यायालयात जाणार आहे. हे न्यायाधीश झाले का? तुम्हाला सुपारी दिलीये तर तुम्ही काम करा तुमचं, तक्रार करा. तपास यंत्रणांना तपास करु द्या. तुम्ही बदनामी का करत आहेत?ते पुढे म्हणाले, आमच्यावरआत्तापर्यंत एकही घोटाळ्याचा आरोप झालेला नाही. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, ते होणार नाही. शरद पवारांचा काय संबंध आहे ह्यात? त्यांचं नाव का घेतायत? त्यांचं नाव घ्यायची लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचं नाव घेतायत हे.

ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरच प्रहार

अनिल परब, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. काल गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत सोमय्या यांना विसर्जनात सहभागी होण्यापासून अडवण्यात आलं तर त्यांचा कोल्हापूर दौराही पोलिसांनी होऊ दिला नाही. त्यांना कराडमध्येच अडवण्यात आलं. यावेळी सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरच प्रहार केले आहेत.

जरंडेश्वर कारखाना त्याची पाहणी करायला ३० तारखेला

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले, मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे. तिथेही मोठा गैरव्यवहार घडलेला आहे. पुढच्या सोमवारी २७ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये बंगल्यांचा जो घोटाळा केला आहे, त्याची पाहणी मी करणार आहे. तर अजित पवारांनी जो बेनामी कारखाना विकत घेतला आहे, जरंडेश्वर कारखाना त्याची पाहणी करायला ३० तारखेला जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक ! मुंबईमध्ये ३ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण

swarit

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण | अजित पवारांच्या अडचणीत मोठी वाढ

News Desk

वर्नोन गाेन्सालवीस, अरुण फरेरा काेर्टात हजर

News Desk