HW News Marathi
देश / विदेश

Dongri Building Collapsed : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या सहवेदना

मुंबई | मुंबईच्या डोंगरी भागात मंगळवारी (१६ जुलै) केसरबाई ही ४ मजली इमारत कोसळली आहे. या भीषण दुर्घटनेत तब्बल ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दुर्घटनाग्रस्तांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या सहवेदना

“डोंगरीतील इमारत दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. माझ्या सहवेदना या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. जखमींची प्रकृती लवकर सुधारेल अशी मला आशा आहे. महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन बचावकार्यादरम्यान शर्थीचे प्रयत्न करत आहेत”, असे ट्वीट पीएमओ इंडियाच्या ट्विटर हँडलवर करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | पंतप्रधानांनी घोषित केलेला ‘जनता कर्फ्यू’ म्हणजे नक्की काय ?

News Desk

थरुर प्रेयसींना कसे भेटणार | सुब्रमण्यम स्वामी

News Desk

गुरुग्राम जमीन व्यवहार प्रकरण | वड्रा आणि हुड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Gauri Tilekar