HW News Marathi
देश / विदेश

वाढदिवस साजरा करू नका ,रक्तदान आणि प्लाझ्मा दान करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं आवाहन !

मुंबई| महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले की सध्याच्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आपण आपला वाढदिवस साजरा करणार नाही.ठाकरे यांनी आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना वाढदिवसप्रसंगी शुभेच्छा देऊन होर्डिंग्ज लावू नयेत असे आवाहन केले आहे. त्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी देणगी द्यावी आणि रक्तदान आणि प्लाझ्मा दान शिबिरांचे आयोजन करावे, असे त्यांनी त्यांच्या कार्यालयातून सांगितले. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस 27 जुलैला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिला वाढदिवस आहे परंतु राज्यावरचं कोरोनाचं संकट पाहता आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. याआधीसुद्धा अनेक नेत्यांनी कोरोना संकटामुळे वाढदिवस साजरा करणे टाळले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी-बायडेन यांची फोनवर झाली चर्चा!

News Desk

आठ वर्षाची चिमुकली म्हणाली लंटाईमध्ये शिक्षक रोज वरच्या खोलीत नेतात, माझ्याशी घाण काम करतात

News Desk

तर अ‍ॅम्बी व्हलीचा लिलाव करू

News Desk