HW News Marathi
Covid-19

‘फक्त भो भो करू नका ,आरोप सिद्ध करा !’ सिद्ध झाले तर राजकारणातून निवृत्त होईन…महापौरांचा सौमय्यांवर पलटवार …

“माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी राजीनामा देवून राजकारणातून निवृत्त होईन. आरोप सिद्ध न झाल्यास किरीट सोमय्या यांनी राजकारणातून कायमचं निवृत्त व्हावं “- महापौर किशोरी पेडणेकर 

मुंबई | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून गंभीर आरोप केले जात आहेत .भाजपचे माजी खासदार किरीट सौमय्या यांनी आता महापौरांच्या मुलाची कंपनी ज्या पत्त्यावर नोंद आहे, त्याच पत्त्यावर आणखी आठ कंपन्यांचीनोंदणी आहे, असा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांवर महापौर किशोरी पेडणेकर या चांगल्याच भडकल्या आहेत. “किरीट सोमय्या यांनी फक्त भो भो करता आरोप सिद्ध करावे”, असा घणाघात किशोरी पेडणेकर यांनी केला  आहे. 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फक्त आरोप करु नयेत. त्यांनी माझ्यावरील आरोप सिद्ध करावे, असं माझं त्यांना आवाहन आहे. याप्रकरणी 100 टक्के चौकशी व्हावी. आरोप सिद्ध झाले तर मी राजीनामा देवून राजकारणातून निवृत्त होईन. आरोप सिद्ध झाल्यासकिरीट सोमय्या यांनी राजकारणातून कायमचं निवृत्त व्हावं. मी आतापर्यंत कधीच बोगस काम केलं नाही. यापुढेही करणार नाही”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदापूरमध्ये माय-लेकींची कोरोनावर मात, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची खास उपस्थिती

News Desk

आता कोणाला सांगणार ‘ही’ राजकारण करण्याची वेळ नाही !

News Desk

बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णसेवेची, कर्तव्यनिष्ठेची नोंद इतिहासात होईल !

News Desk