HW News Marathi
महाराष्ट्र

जळगाव: महिला वसतिगृहात काय झाले याची माहिती न घेता जळगावची बदनामी करु नका, खडसेंनी भाजपला ठणकावले

जळगाव | जळगाव येथील गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मात्र वसतिगृहातील कथित घटनेसंदर्भात सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली असून, तेथे कोणतेही गैरकृत्य घडले नसल्याचा निष्कर्ष समितीने अहवालात काढला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल (४ मार्च) विधानसभेत दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगावची नाहक बदनामी झाली. या प्रकरणाची सर्व माहिती घेऊनच विरोधी पक्षाने बोलायला पाहिजे होते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यभर जळगावची बदनामी झाली आहे. कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. हा उठावडेपणा आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले गृहमंत्री अनिल देशमुख?

जळगावातील कथित घटनेसंदर्भात विविध खात्यांतील सहा महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वसतिगृहातील सर्व १७ महिलांशी चर्चा केली. ४१ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत. समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे निदर्शनास आले आहे. महिला वसतिगृह असल्याने तिथे पुरुष अधिकारी आत जाऊ शकत नाही. पोलिसांनी त्या कथित घटनेचा व्हिडीओ काढला असे सांगितले जात असले तरी असा कोणताही व्हिडीओ पुरावा म्हणून समितीला मिळाला नाही, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीतील पक्षांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे !

News Desk

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडेवर उपमुख्यमंत्र्यांची सडकून टीका

Aprna

शरद पवारांच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ट्विटर युद्ध

Aprna