HW News Marathi
महाराष्ट्र

आंबेडकर आणि फुले जयंती एक दिवा ज्ञानाचा लावून, घरी राहून साजरा दिवस करूया !

मुंबई | “महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एक दिवा ज्ञानाचा लावून हा दिवस घरी राहून साजरा करूया,” असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. शरद पवार यांनी आज (६ एप्रिल) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाववर संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, “आज लोक घरीच महावीर जयंती साजरी करत आहेत, असेही पवार यावेळी म्हणाले.

पवार म्हणाल की, “उद्या ७ तारखेला शब-ए-बारात आहे. त्या दिवशी मुस्लिम बांधवांनी आपल्या पूर्वजांचे घरातच स्मरण करावे. तसेच ११ तारखेला महात्मा फुले यांची जयंती असून त्यांची जयंती घरीच साजरी करा. एक दिवा ज्ञानाचा असा संदेश फुले जयंतीतून द्या, तर १४ एप्रिलला एक दिवा संविधानाचा लावून आंबेडकर जयंती घरच्या घरीच साजरी करा. जयंती, धार्मिक कार्यक्रमांना उत्सवी स्वरूप आणू नका, गर्दी टाळा,” असे आवाहन पवारांनी राज्यातील जनतेला केले.

दरम्यान, पवारांनी फेसबुक लाईव्हद्वारे आफवांवर देखील भाष केले, “समाजात कटुता, तणाव, संशय वाढेल, अशी परिस्थिती येऊ देता कामा नये. व्हॉट्सअॅपवरील मेसेज काळजी करण्यासारखे आहेत. पाचपैकी चार मेसेज खोटे असतात, त्यामधून संभ्रम निर्माण केले जातात, गैरसमज पसरवले जात आहेत.”

महाराष्ट्राप्रमाणे दिल्लींने देखील खबरदारी घ्याला हवी

देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात झाला आहे. महाराष्ट्रातही धार्मिक कार्यक्रमाची विनंती करण्यात आली होती. मात्र, राज्याच्या गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी अशा कार्यक्रमांनी वेळीच परवानगी नाकारली. महाराष्ट्राप्रणाणे दिल्लीत अशीच खबरदारी घेतली, असे म्हणत पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

News Desk

लॅटव्हियामध्ये अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी उदय सामंत प्रयत्नशील

swarit

चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये !

News Desk