HW News Marathi
महाराष्ट्र

‘राजगृह’वर झालेल्या तोडफोडीचा सीसीटीव्ही फुटेज आला समोर

मुंबई | संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर काल (७ जुलै) संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात दोन संशयितांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. तसेच तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात कुंड्या फोडताना हा इसम दिसत आहे. दरम्यान पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर दोन माथेफिरुंनी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास तोडफोड केली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

https://www.facebook.com/401858593580943/posts/990400901393373/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं – अजित पवार

News Desk

महाराष्ट्र मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल, नव्या चेहऱ्यांना संधी?

News Desk

26 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या पथकाला एकनाथ शिंदेकडून 51 लाखांचं बक्षीस!

News Desk