HW News Marathi
क्राइम

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | पोलीस, माध्यमांद्वारे चौकशी करणे ही योग्य पद्धत नाही !

मुंबई | नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तीन फरारी महिला डॉक्टरांच्या रूमवर रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी नोटीस चिकटवली आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी महाविद्यालयात सीनिअर असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार असून या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.

तडवी हत्या प्रकरण तापल्यानंतर या तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांनी मार्ड (महाराष्ट्र ओसिसिएशन ऑफ रेजिडेन्ट डॉक्टर) यांना एका पत्रात म्हटले की, “आमची बाजू ऐकून न घेतता, पोलीस आणि प्रसार माध्यमांद्वारे चौकशी करणे ही योग्य पद्धत नाही. तर आमची अशी इच्छा आहे, की या प्रकरणी महाविद्यालयीन ही निष्पक्ष चौकशी व्हावी.”

 

तिघींविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास तात्काळ अटक करुन त्यांच्यावर आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. या मागणीकरिता आदिवासी तडवी समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने जळगावात आंदोलन केले गेले. तसेच या प्रकरणी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात असून आरोपांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या तरुणीने बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली आहे. मयत तरूणी ही आदिवासी तडवी समाजाची होती. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

डॉ.पायल नायर रुग्णालय मंबईमध्ये शिक्षण घेत होती. १ मे २०१८ रोजी तिला मागासर्गीय राखीव कोट्यातून प्रवेश मिळाला होता. यानंतर रुग्णालयात सीनिअर असलेल्या डॉ. हेमा आहूजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी सतत तिचा छळ केला. तिने मागासवर्गीय आरक्षित जागेवर प्रवेश मिळवला. म्हणून तिला जातीवाचक टोचून बोलत होते. याबाबत तरुणीने वारंवार डीनकडे तक्रार देखील केली होती. पण तरीसुद्धा त्याची योग्य दखल घेण्यात आली नाही. पायलच्या आईने देखील या घटनेआधी नायर रुग्णालयाच्या डीनला पत्र लिहून याबाबत कळविले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगर:विषारी दारु विक्रीमुळे मृत्युस कारणीभुत असलेले ३ जण नांदेड पोलिसांच्या जाळ्यात

News Desk

बॅगेत मृतदेह टाकून मुलगी, जावाई फरार

News Desk

“आज आले नसते तर फरार घोषित केले असते, ते टाळण्यासाठीच…”- चंद्रकांत पाटलांचा टोला

News Desk