मुंबई | डॉ. पायल तडवी प्रकरणी क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तडवी कुटुंबियांनी आज (३० मे) मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा आदेश दिला आहे. वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी यांनी आपल्या वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली.
Dr Payal Tadvi suicide case has been transferred to Mumbai Police's crime branch unit.
— ANI (@ANI) May 30, 2019
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींनाही अटक करण्यात आली आहे. डॉ. भक्ती मेहेर हिला मंगळवारी (२८मे) संध्याकाळी पहिली अटक झाली. दरम्यान, या तिन्ही आरोपींना काल (२९ मे) मुंबई सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात आले. दरम्यान, अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरएम सद्रानी यांनी या तिन्ही आरोपींना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपींना भारतीय दंड संहितेच्या अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, रॅगिंग विरोधी कायदा, आयटी कायदा आणि कलम ३०६ (आत्महत्याची उकल) अंतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.