HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण । तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

मुंबई । डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींनाही अटक करण्यात आली आहे. डॉ. भक्ती मेहेर हिला मंगळवारी (२८मे) संध्याकाळी पहिली अटक झाली. दरम्यान, या तिन्ही आरोपींना आज (२९ मे) मुंबई सत्र न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

जातीयवादावरून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी यांनी बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली होती. या तिन्ही आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला होता. मात्र, या तिघीही फरार होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दप्तराविना शाळा! अनोख्या उपक्रमातून परिवर्तनाचे धडे

News Desk

पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि खाजगी विकासकांमध्ये करार

Aprna

देशमुख गेले, राठोड गेले, आता ‘या’ मंत्र्याचा नंबर, भाजपच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

News Desk