HW News Marathi
महाराष्ट्र

महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण

सातारा | प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचरणी महिला धोरणाचा मसुदा बहुचर्चित आणि प्रतीक्षित अशा चौथ्या महिला धोरणाचा मसूदा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसंच आई भवानीच्या चरणी अर्पण करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात आहे, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

महिला धोरण आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. मात्र, आता महिला धोरणाची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य अशीही महाराष्ट्राची ओळख नवीन धोरणामुळे होणार आहे. महिलांसोबत LGBTQ ( इतर लिंगी समुदाय ) समुदायाचा या धोरणात आवर्जून समावेश करण्यात आलेला आहे. असा समावेश असलेले हे बहुधा देशातील पहिलेच धोरण आहे. महिला धोरण हे केवळ कागदावरच राहणार नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती त्यावर देखरेख करणार आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय महिला व बाल विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्सही स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष राहिल तसेच, या धोरणात आखून दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तताही युद्ध पातळीवर होऊ शकेल.या धोरणामुळे जेंडर बजेटची संकल्पना ही अधिक प्रभावीपणे राबवता येईल, असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. तसेच चौथ्या सुधारित महिला धोरणाच्या निर्मितीत महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी, लोकप्रतिनिधींनी, तज्ज्ञांनी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला संघटनेने, युनिसेफ तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग घेतलेला असल्याचेही यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीसारख्या संस्थेचा राजकीय पद्धतीने वापर करणे अयोग्य – रोहित पवार

News Desk

कर्णबधिरांच्या मोर्चावर पोलिसांची आमानुष मारहाण

News Desk

अग्निशमन दलाच्या मुख्यालयात इफ्तार पार्टीचे आयोजन  

News Desk