HW News Marathi
महाराष्ट्र

तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्यावर इन्कम टॅक्सची छापेमारी

मुंबई | इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आता बॉलिवूडकर असल्याचं पाहायला मिळतं आहे. इन्कम टॅक्स विभागाने बॉलिवूडमधील काही महत्त्वाच्या कलाकार आणि दिग्दर्शकांवर धाड टाकल्याची माहिती समोर येते आहे. अभिनेत्री तापसी पन्नू , दिग्दर्शक अनुराग कश्यप , विकास बहल यांच्या विविध ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकला आहे.

मुंबईतील विविध ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. फँटम फिल्म्स संबंधित ही छापेमारी करण्यात आली आहे.मुंबईसह पुण्यातही या कलाकारांची मालकीच्या असणाऱ्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. एकूण २२ ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे.

‘फँटम फिल्म’ आणि क्वान या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. या कर चोरी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही आयकरनं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी २०११मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी २०१८ मध्ये बंद करण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तारांनी राजीनामा दिला नाही!

swarit

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘भारतीय सैन्य दिना’च्या  सर्वांना शुभेच्छा!

News Desk

लोकाभिमुख पोलिसिंगचा उत्तम आदर्श म्हणजे डॉ. के. वेंकटेशम

News Desk