HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात आज कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला होणार सुरुवात

मुंबई | सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीनं विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीला मान्यता मिळाली आहे. आणि आजपासून कोरोना लसीकरणासाठी देशभरात ड्राय रन घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष असतील. प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबवताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, हे प्रामुख्याने सराव फेरीत तपासले जाईल. लसीकरणासाठी देशभरात आतापर्यंत ९६ हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ड्राय रन म्हणजे काय?

ड्राय रन म्हणजे कोरोना लसीकरणाची सराव फेरी आहे. यानिमित्ताने डॉक्टर्स, रुग्णालये, वैद्यकीय कर्मचारी लसीकरणाच्या प्रक्रियेसाठी कितपत तयार आहेत, हे तपासले जाईल. त्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये यंत्रणा उभारण्यात येईल. कोरोना लसीला परवानगी मिळाल्यानंतर याठिकाणी सर्वप्रथम लसीकरणाला सुरुवात होईल. ड्राय रनमध्ये एकप्रकारे लसीकरण प्रक्रियेचा सराव केला जाईल.ट्रायल रन आणि ड्राय रनमध्ये काय फरक?

कोरोना लसीकरणाच्या ट्रायल रन आणि ड्राय रनमध्ये बराच फरक आहे. जयपूरमध्ये काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पार पडली. यावेळी संबंधित स्वयंसेवकांना कोरोनाची लस प्रत्यक्षात देण्यात आली. त्यानंतर स्वयंसेवकांना 28 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. 28 दिवस झाल्यावर स्वयंसेवकांना पुन्हा एक डोस दिला जातो. याउलट ड्राय रनमध्ये प्रत्यक्ष लस दिली जात नाही.

ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन साईट (आरोग्य केंद्र) निवडण्यात आली आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी 25 जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही. मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील ७५ लोकांवर आज कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भगवान पवार यांनी दिली. “कोरोना लसीकरण मोहिमेच्या रंगीत तालमीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड या प्रत्येक ठिकाणच्या २५ लोकांची रंगीत तालिम अनुक्रमे जिल्हा औंध रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र (माण, ता. मुळशी) आणि जिजामाता आरोग्य केंद्र (पिंपरी-चिंचवड) येथे होणार आहे. लसीकरणासाठी आवश्यक सर्व तयारी, ‘ॲप’वर माहिती भरणे आदीची रंगीत तालीम होणार आहे.

नागपुरात तीन ठिकाणी ड्राय रननागपुरात तीन ठिकाणी ड्राय रनची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर 25 लोक ड्राय रनमध्ये सहभागी होणार आहेत. या सर्वांना प्रत्यक्षात लस दिली जाणार नाही. तर लसीकरणाची सराव चाचणी पार पडेल.शहरी भागात डागा हॉस्पिटल आणि के टी नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर ग्रामीण भागात कामठी रुग्णालय येथे ड्राय रन पार पडेल. प्रत्येक केंद्रावर चार व्हॅक्सिनेशन अधिकारी उपस्थित असतील.ड्राय रनच्या प्रक्रियेत सर्वप्रथम covid app मध्ये एन्ट्री केल्या जातील. vaccine दिल्यासारखे करतील. मग संबंधित स्वयंसेवकाला काहीवेळ निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. जेणेकरुन त्याच्यावर लसीचे काही दुष्परिणाम होतात का, हे तपासता येईल.कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरेल, अशी लस दृष्टिपथात आलेली असतानाच आता लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जालन्यात शनिवारी जिल्ह्यातील तीन केंद्रांवर ड्राय रन होणार असून, यासाठी ७५ कर्मचाऱ्यांची निवड केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.लसीकरणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, जिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव येथे ड्राय रन होणार आहे. या ड्राय रनसाठी आरोग्य विभागातील ७५ कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या ७५ जणांना तासभराअगोदरच मोबाइल मेसेज येईल. त्यानंतरच त्यांना लसीकरणासाठी येता येईल. प्रत्येक केंद्रावर डॉक्टरांसह ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस यांचा समावेश आहे. लसीकरणासाठी तीन रूम तयार केल्या आहेत.

दरम्यान, सीरमचे सीईओ अदर पुनावालांच्या म्हणण्यानुसार ही लस सरकारला 200 ते 250 रुपयांपर्यंत मिळू शकते, तर खासगी विक्रेत्यांना ही लस 500 ते 600 रुपयांपर्यंत मिळू शकते. मात्र, तुम्हाला ही लस घेण्यासाठी खिशातील एकही रुपया खर्च करण्याची गरज भासण्याची शक्यता कमी आहे. कारण, कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारकडून प्रत्येकाला ही लस मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे हा ड्राय रन यशस्वी होतो का आणि प्रत्यक्षात लसीकरणाला कधी सुरुवात होणार हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांची ‘ती’ मागणी अजित पवारांकडून मान्य

News Desk

बिल गेट्स यांनी पत्रातून भारताबद्दलची भावना व्यक्त केली

News Desk

देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी-प्रशासनाचा एकमताने निर्णय

News Desk