HW News Marathi
महाराष्ट्र

 डिएसकेंची मालमत्ता होणार जप्त, सरकारचा आदेश

पुणे | महाराष्ट्रातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णी अर्थात डीएसके यांची मालमत्ता जप्त करण्याची अधिसूचना राज्य सरकारने काढले. यात त्यांच्या १२४ ठिकाणी असलेल्या त्यांच्या जमिनी, २७६ बँकेची खाती, ४६ वाहने आणि त्यांचे १०७ प्लॉट्स यांचा समावेश आहे.

डीएसके यांनी गुंतवणुकदारांच्या ठेवी मुदतपूर्तीनंतर परत केल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या संरक्षण अधिनियम १९९९ नुसारही गुन्हे दाखल करण्‍यात आले आहेत. डीएसके यांच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर, कोल्हापूर, मुंबई येथील पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

  • काय काय होणार जप्त

१. १२४ ठिकाणी असलेल्या जमिनी

२. कंपनीची आणि वैयक्तिक मिळून २७६ बँकेची खाती

३. १०७ प्लॉट्स

४. टोयोटा लँड क्रूझर, ऑडी, BMW, टोयोटा फॉर्च्युनर, इनोव्हा आणि स्कॉर्पिओ अशी एकूण ४६ वाहने

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदिरा गांधींना दिलेला शब्द बाळासाहेबांनी पाळला, आताही राज्य सरकार पाच वर्षे टिकेल –  शरद पवार

News Desk

आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करा; एकनाथ शिंदेंनी पावसाळापूर्व कामांचा घेतला आढावा

Aprna

शिवसेना मंत्री-नेत्यांची तातडीची बैठक, उद्धव ठाकरे राठोडांबाबत कठोर निर्णय घेणार ?

News Desk