HW News Marathi
मुंबई

एकबोटेंच्या जामिनाला आव्हान

मुंबई | भीमा कोरेगावमध्ये झालेल्या जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणात हिंसाचार करण्यास जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांच्या जामिनाला आव्हान देणारी याचिका एका पीडित व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. १ जानेवारी रोजी द्विशताब्दीच्या निमित्ताने भीमा – कोरेगाव येथे शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती.

द्विशताब्दीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या काही लोकांवर अचानक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांना समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांनी चिथावणी दिल्याचा आरोप मिलिंद एकबोटे यांच्यावर आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी एकबोटे यांच्या विरुद्ध चिथावणी अॅट्रॉसिटी अंतर्गत एफआयआर नोंदवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मार्चमध्ये एकबोटेंना अटक केली होती.

अटकेनंतर महिन्याभरात पुणे सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.परंतु सत्र न्यायालयाच्या निर्णयाला पीडितांपैकी एक असलेले संजय भालेराव यांनी अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. भालेराव यांच्या याचिकेवर ५ जूनला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई क्रिकेट असोसिएशनने पोलीस बंदोबस्ताचे १३.४२ कोटी थकविले

swarit

माहुलमध्ये प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करू नका, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

News Desk

सांताक्रूझ येथे गुजराल हाऊसला आग

News Desk