HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना रुग्णांची वाढती संख्या; मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू

मुंबई। गेल्या काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. तर देशात आता कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्या देखील वाढताना आपल्या पाहायला मिळत असून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून मुंबई काही निर्बंध घातले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत कलम १४४ लागू केला आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे असून ही जमावबंदी ३० डिसेंबरपासून ते ७ जानेवारीपर्यंत असणार आहे. या कालावधीत रेस्तराँ, हॉटेल्स, ओपन स्पेस किंवा बंदिस्त जागांमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जमू नये, असा आदेश पोलिसांकडून दिल्या आहेत. या आदेशानुसार, कोणतीही व्यक्तीने निमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा १८९७ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल

मुंबईत ३ हजार ६७१ नवे रुग्ण

मुंबईत काल (३० डिसेंबर) कोरोनाबाधिकांची संख्या ३ हजार ६७१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर काल एकाचाही मृत्यू झाला नाही, अशी माहिती राज्यातील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेतून त्यांनी माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकल वापर प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

Manasi Devkar

कमला मिलमधील पबच्या आगीत होरपळून मुत्यू झालेल्या १४ मुंबईकरांना न्याय द्या, शेलारांचे मुख्यमंत्र्याना पत्र

News Desk

धार्मिक तेढ निर्माण होणे ही निराशाजनक बाब, प्रीतम मुंडेंनी व्यक्त केली खंत

Aprna