HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंना रेणू शर्मा प्रकरणात दिलासा, बलात्काराची तक्रार घेतली मागे

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना रेणू शर्मा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रारार केली होती आणि धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्याच तक्रारारदार महिलेने आता यू-टर्न मारत आपली तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्माने लेखी अर्ज देवून आपली तक्रार मागे घेतली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले आहे. एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला.

“मी केलेली तक्रार काही कारणास्तव मी मागे घेत आहे” असं प्रतिज्ञपत्र रेणू शर्मा हिने पोलिसांना दिले आहे. तर या प्रकरणातील रेणू शर्माचे वकील यांनी काही दिवसांपूर्वीच काही खाजगी कारण सांगत रेणू शर्माची केस त्यांनी सोडली होती. त्यानंतर आता रेणू शर्मानेच तक्रार मागे घेतली त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उमरगा MIDC मधील जोगेश्वरी ब्रिव्हरेज कंपनीची मालमत्ता EDकडून जप्त

Manasi Devkar

छगन भुजबळांवर शिवसेनेची बॅनरमधून जहरी टीका

News Desk

इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत त्वरीत नोंदणी सूट मर्यादेस मुदतवाढ

Aprna