मुंबई | राज्यात अवकाळी पावसाने शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज (१ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. राज्यातील ३२५ तालुक्यांमध्ये तब्बल ५४ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. हे नुकसान वाढण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
CM @Dev_Fadnavis appealed officials to handle this situation very sensitively & as top priority.
Keep response mechanism in place like during drought times in every district,so that every farmer grievance can be heard.
CM directed to give WhatsApp numbers to communicate directly pic.twitter.com/X23b74KlT0— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 1, 2019
तसेच ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिके यामुळे बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत-पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी देखील पत्रकार परिषदेच्या यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की, उद्या (२ नोव्हेंबर) उपसमितीची बैठक बोलावली असून उपसमितीला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. उद्याच्या बैठकीत तत्काळ शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, याबाबत विचार केला जाईल. ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होऊ शकलेले नाहीत. त्यांना देखील मदत मिळेल, याची काळजी घेतली असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना आदेश दिले आहेत की, आपआपल्या जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त भागांना भेटी द्या. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घ्या. जेणेकरुन आपल्याला सर्व शेतकऱ्यांना लागेल ती मदत करता येईल. आमचे सरकार हा विषय गांभीर्याने हाताळत असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.
अवकाळी पावसामुळे ऐवढे नुकसान झाले
- औरंगाबादला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून २२ लाख हेक्टर शेतीचे नुकसान
- नाशिकमधील ५२ तालुक्यांमधील १६ लाख हेक्टर शेतीचे नुकसान
- अमरावतीत १२ लाख हेक्टर जमीन बाधित तर ५३ हजार हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले आहे.
- २ लाख हेक्टरवरील ज्वारी, ५ लाख हेक्टरवरील मक्याचे पिक बाधित तर १८ ते १९ लाख हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान
- कोकणातील ४६ तालुक्यांमधील ९७ हजार हेक्टर शेतीचे नुकसान
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.