HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : राज्यात संचारबंदीमध्ये कोणा कोणाला मिळणार पेट्रोल-डिझेल

मुंबई | महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. रविवारी (२२ मार्च) जनता कर्फ्यूनंतर काल (२३ मार्च) मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर सकाळी वाहनांची तोबा गर्दी झाली. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल विक्रीसही बंदी करण्यात आली आहे. सीमा बंदी आता राज्यातील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यांची खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेताल आहे. या नियमाअंतर्गत याअंतर्गत जिल्हा-जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. म्हणून पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

राज्यातील संचारबंदी दरम्यान, या बंदी अंतर्गत दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनांना पेट्रोल भरण्यास मनाई करण्यात आली आहे. तर, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यकमध्ये अन्नधान्याच्या वस्तू ने आण करणारे, डॉक्टर, खासगी व्यक्ती, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. तर एखाद्या व्यक्तीस वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणाऱ्या व्यक्तींना यामध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र, सूट देणाऱ्या व्यक्तींनी एकदाच टाकी फुल करणे बंधनकारक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोलसाठी नियमावली बनवली आहे. या नियमावलीनुसार रत्नागिरीत फक्त दुचाकी चालकांना पेट्रोल मिळणार आहे. तर तीनचाकी, चारचाकी किंवा अवजड वाहनांना पेट्रोल दिले जाणार नाही. दुचाकी चालकांना फक्त सकाळी १० ते १ आणि दुपारी ४ ते ६ याच वेळेत पेट्रोल मिळणार आहे.

खालील सेवा पुरविणाऱ्यांना पेट्रोल मिळाणार

  • बँक, एटीएम, आर्थिक व्यवहाराशी निगडीत सेवा
  • प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडिया
  • आयटी, टेलिकॉम, इंटरनेट सेवा
  • अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या संस्थांना
  • खाजगी सुरक्षा व्यवस्था
  • अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक
  • शेतीविषयक वस्तूंची वाहतूक
  • हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर
  • एलपीजी गॅल
  • अन्नपदार्थ किंवा औषधाची वाहतूक करणाऱ्या ई-कॉमर्स सेवा
  • अन्नपदार्थ, किराणा, धान्य, दूध, पाव, फळे, भाज्या, अंडी, मासे, चिकन, मटण यांची दुकाने आणि वाहतूक
  • पशूंना आवश्यक वस्तूंची दुकाने आणि वाहतूक
  • उपाहारगृहांमधील पार्सल सेवा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाच वर्षांच्या बालिकेचा ‘कळसुबाई’वर झेंडा

News Desk

मंत्री धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ प्रकरणावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया

News Desk

अखेर शिक्कामोर्तब ! मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

News Desk