HW News Marathi
Covid-19

भाजपच्या लोकांनी लवकर दौरे करून अनेक नारळाची झाडे उभी केली, मला आनंद !

मुंबई। भाजपच्या लोकांनी लवकर दौरे केले. त्यांनी अनेक नारळाची झाडे उभी केली. मला आनंद आहे, त्यांचे अभिनंदन, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. भाजपने निसर्ग चक्रीवादळानंतर तात्काळ मदत पोहोचवली. यानंतर शरद पवारांना जाग आल्याने ते आता कोकण दौरा करत आहेत, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील शरद पवार यांच्यावर केली.

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरीत दौ-यावर माध्यमांशी बोलताना म्हणाले. नुकतेच निसर्ग चक्रीवादळाचा तडाका कोकणाला बसला. यात कोकणाचे मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच रायगड जिल्ह्याचा दौरा केला होता. यानंतर आता शरद पवार सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच रायगड जिल्ह्याचा दौरा केला होता. यानंतर आता शरद पवार सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या मुद्द्यावरून पाटील यांनी काल (८जून) पवारांसह मुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासा कायम ! राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक

News Desk

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

News Desk

हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार, विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच केले नाहीत

News Desk