HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफी ते कोविड विषयक नियोजनापर्यंत प्रत्येक आपत्तीला राज्य सरकारने धैर्याने तोंड दिले अन विरोधक मात्र चुका काढत राहिले!

मुंबई | मागील सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर एखाद्या पंचवार्षिक योजनेप्रमाणे अनेक दिवस ती प्रक्रिया लांबवत नेली गेली व त्याचा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागला, आमच्या महाविकास सरकारने सत्तेत येताच १५ दिवसात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आणि लागलीच कर्जमाफीच्या रक्कमा वर्ग केल्या. During the last two years, the state has been hit by one or more disasters like cyclone, Kovid.

This view was expressed by Social Justice Minister Dhananjay Munde while speaking in the Legislative Council yesterday.

नियम 260 अन्वये विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रस्तावास सरकारच्या वतीने विधानपरिषदेत धनंजय मुंडे यांनी उत्तरे दिली. यावेळी महाविकास आघाडी सरकारने आव्हानात्मक परिस्थितीही मागील सरकारच्या तुलनेत या सरकारची कामगिरी उत्तम असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी उत्तर देणे अपेक्षित असताना सामाजिक न्याय मंत्री सरकारची बाजू मांडत आहेत, असे म्हणत विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एका प्रकारे सामाजिक न्याय विभागाला कमी लेखायचा प्रयत्न केल्याचे दिसताच त्यावर हरकतीचा मुद्दा मुंडेंनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या सर्व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी सुरू केलेल्या या विभागाला कोणीही कमी लेखू नये, असा इशाराच धनंजय मुंडे यांनी विरोधकांना दिला.

केंद्राने राज्याच्या सहकाराचा आदर्श घेतला

विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, आ. सदाभाऊ खोत यांनी सहकार व विशेषतः साखर उद्योगावरून केलेल्या टीकेला उत्तर देत, राज्याच्या सहकार क्षेत्राची समृद्धीकडे वाटचाल सुरू असून, राज्याच्या सहकार क्षेत्राच्या कारभाराचा आदर्श घेत केंद्र सरकारने सहकार विभाग नव्याने सुरू केला असल्याचे धनंजय मुंडे यांनी नमूद केले. ओबीसी आरक्षणाची पाळेमुळे कुठे आहेत, राज्य सरकारने इंपेरिकल डेटा व अन्य कामांसाठी नव्याने जाहीर केलेले ५०० कोटी रुपये आदी मुद्द्यांवर भाष्य करत धनंजय मुंडे यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले.

अतिवृष्टी व त्यामुळे आलेल्या महापुराच्या संकट काळात महिनाभर शेतांमध्ये पाणी साचलेले होते परंतु केंद्र सरकारचा एक माणूसही या नुकसानीची पाहणी करायला राज्यात फिरकला नाही, राज्य सरकारने मात्र शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे पॅकेज घोषित करून त्यातील रकमा वितरित देखील केल्या; असेही धनंजय मुंडे म्हणाले. शेतकऱ्यांना वीज वितरणात व बिल वसुली संदर्भात येत असलेल्या अडचणी व सरकारचे व्याज, दंड माफ करण्याचे धोरण यावरही धनंजय मुंडे यांनी प्रकाश टाकला. आपण सर्व शेतकरी कुटुंबातील असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले लोक आहोत, त्यामुळे ऊर्जा विभागाचे १४व्या व १५ व्या वित्त आयोगाचे धोरण, केंद्र सरकारची अनास्था या बाबी विचारात घेऊन या कठीण प्रसंगात मार्ग काढण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी योग्य भूमिका घेणे गरजेचे असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

चुका काढण्यावरून मुंडेंची शायरी

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कालावधीत विरोधकांनी या ना त्या कारणावरून सतत सरकारला कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न केले, अनेक आरोप केले, याचा संदर्भ देत “उम्र बिता दि औरो के वजूद मे नूक्स निकालते निकालते, अगर इतना ही खुद को तराशा होता, तो फरीष्ते बन जाते!” अशी शायरी म्हणत सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच कितीही कारस्थाने झाली तरी हे सरकार मजबूत असून आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील ‘या’ सहा महिलांना मिळणार ‘नारी शक्ती’ पुरस्कार

News Desk

‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा !’ -छत्रपती संभाजीराजे

News Desk

स्वतःचे अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे हे वक्तव्य ! | अजित पवार

News Desk