HW News Marathi
महाराष्ट्र

वेतन पडताळणी पथक १८ ते २१ जुलै दरम्यान नांदेडच्या दौऱ्यावर 

नांदेड – जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाची पाहणी करण्यासाठी वेतन पडताळणी पथक येत्या १८ ते २१ जुलै या काळात नांदेडच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहे, अशी माहिती औरंगाबादच्या लेखा व कोषागरे विभागाच्या सहसंचालकांनी दिलीय.

वेतन पडताळणी पथक मंगळवार १८ जुलै २०१७ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार १९ जुलै ते शुक्रवार २१ जुलै २०१७ काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी हे पथक या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील.

वेतन पडताळणीस सेवा पुस्तके सादर करण्यापुर्वी शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर १२९९/प्र.क्र.५/९९/सेवा-१० दि. २० जानेवारी २००१ चे सोबत जोडलेले विवरणपत्र संबंधितांच्या सेवा पुस्तकात लावून त्याप्रमाणे सेवा पुस्तके पडताळणीस सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवा निवृत्ती होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन, लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करताना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगीन करावे डीडीओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजरनेम आणि पासवर्ड वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहे त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकून Submit करावे. म्हणजे लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार होईल. त्याच पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी पथकाकडे सादर करावीत, असे सूचित केले आहे.

https://www.facebook.com/mahabatmi365/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध, दहा रुपयांत थाळी, एक रुपयात आरोग्य चाचणी

News Desk

दारू पिणाऱ्यांना महिलांनी दिला चोप, व्हिडिओ व्हायरल

News Desk

आजपासून गॅस सिलेंडरच्या दरात कपात

News Desk