मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या कित्येक महिन्यांपासून देशासह राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरु असली तरीही मार्च महिन्यापासून राज्यात जिल्हाबंदी मात्र कायम होती. मात्र, नुकताच राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून आता ही जिल्हा बंदी अखेर उठविण्यात आलेली आहे. सरकारने आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास रद्द करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने आता अनेक अटी-नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून ‘अनलॉक ४’बद्दलची मार्गदर्शक तत्त्वे काहीच दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर, आज (३१ ऑगस्ट) राज्य सरकारकडून देखील नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सर्वसामान्यांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून ई-पास रद्द करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती.याच पार्श्वभूमी, राज्य सरकारने या मागणीची दाखल घेतली आहे.
काय सुरू आणि काय बंद?
राज्यातील हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार
शाळा-कॉलेज मात्र 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही
खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे
चित्रपटगृह 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही
Maharashtra Govt extends lockdown in the state till 30th September. Interdistrict transport of goods and persons are allowed. Private bus and minibus are also allowed to operate; SOPs for the same will issued by State Transport Commissioner.
— ANI (@ANI) August 31, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.