HW News Marathi
देश / विदेश

‘आपमतलब्यां’चा पराभव झाला, सामनातून भाजपवर टीका

मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. आपने ७० पैकी ६२ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपच्या वाटेला ८ जागा मिळाल्या आहेत.केजरीवाल यांनी केलेल्या कामांच्या जोरावर सत्ता पुन्हा मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली. केजरीवाल यांनी दिल्लीतील शाळांवर मोठे काम केले. सरकारी शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तराचा केला. या शाळा, त्यांची शिक्षण पद्धती जगात आदर्श ठरली. केजरीवाल यांनी आरोग्य व्यवस्थेत मोठी सुधारणा केली. त्यांच्या मोहल्ला क्लिनिक योजनेचा लाभ गोरगरीबांना मिळाला. भ्रष्टाचार शून्यावर आला. केजरीवाल यांचा दिल्ली प्रदेश हा केंद्रशासित असल्याने कायदा सुव्यवस्था, पोलीस, उद्योग हे विषय त्यांच्या अखत्यारीत येत नाहीत. त्याचा त्यांना फायदाच झाला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ बारा वाजले व त्याचे खापर मोदी-शहांवर फोडण्यात ते यशस्वी झाले, पण पाणी आणि वीज बिल माफीचे संपूर्ण श्रेय त्यांनी घेतले. भाजप हिंदू-मुसलमान, पाकिस्तान वगैरे बोंबलत बसले. ”केजरीवाल हे एक नंबरचे आतंकवादी आहेत” असे भाजपने जाहीर केले, पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या ‘आप’चा झाला. ‘आपमतलब्यां’चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळय़ांना साफ केले. केजरीवाल यांचे अभिनंदन, सामनाच्या अग्रलेखातून दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळालेल्या अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली.

सामनाचा आजचा अग्रलेख

केजरीवाल यांनी केलेल्या कामांच्या जोरावर सत्ता पुन्हा मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली. केजरीवाल यांचा दिल्ली प्रदेश हा केंद्रशासित असल्याने कायदा सुव्यवस्था, पोलीस, उद्योग हे विषय त्यांच्या अखत्यारीत येत नाहीत. त्याचा त्यांना फायदाच झाला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ बारा वाजले व त्याचे खापर मोदी-शहांवर फोडण्यात ते यशस्वी झाले, पण पाणी आणि वीज बिल माफीचे संपूर्ण श्रेय त्यांनी घेतले. भाजप हिंदू-मुसलमान, पाकिस्तान वगैरे बोंबलत बसले. पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या ‘आप’चा झाला. ‘आपमतलब्यां’चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळय़ांना साफ केले. केजरीवाल यांचे अभिनंदन!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा विजय झाला यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षाही दिल्लीची निवडणूक गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिष्ठsची केली होती. जयप्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, पण दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे सूत्रधार अमित शहा हेच होते. पक्षाचे अध्यक्षपद सोडताना त्यांना एक विजय मिळवायचा होता. ते शक्य झाले नाही. झारखंडमध्ये पराभव झाला व ध्यानीमनी नसताना महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे गेले. देशाच्या राजधानीवर ‘आप’चा झेंडा फडकला, तर आर्थिक राजधानीवर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्य करीत आहे. हा बाण काळजात आरपार खुपणारा आहे. लोकसभा निवडणुकीतील मोठय़ा विजयानंतर भाजपला एकापाठोपाठ एक राज्ये गमवावी लागली आहेत. चार महिन्यांपूर्वी दिल्लीतील सातपैकी सात लोकसभा जागांवर भाजपचा विजय झाला तो पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा होता. मोदी किंवा भाजपसमोर एखाद्या पक्षाचे किंवा नेत्याचे तगडे आव्हान नव्हते. त्यामुळे भाजपचा एकतर्फी विजय झाला, पण विधानसभा निवडणुकीत एकीकडे राज्यांतील तगडे नेतृत्व आणि त्यांच्यासमोर मोदी आणि शहांची ‘हवाबाज’ नीती फोल असे चित्र निर्माण झाले आहे. दिल्ली विधानसभेचा निकाल पाहिला तर एकटे केजरीवाल हे संपूर्ण केंद्र सरकार व शक्तिमान भाजपला भारी पडले आहेत. केजरीवाल यांच्या पराभवासाठी भाजपने देशभरातील अडीचशे खासदार, दोन-चारशे आमदार, मुख्यमंत्री तसेच राज्यांचे मंत्री व संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ मैदानात उतरवले होते, पण त्या सर्व फौजांचे शेवटी दिल्लीच्या मैदानावर साफ पानिपत झाले. अहंकार, मस्तवालपणा आणि ‘हम करे सो कायदा’ या वृत्तीचा हा पराभव आहे.

दिल्लीच्या विधानसभेत कोणत्या प्रश्नांवर निवडणुका लढवाव्यात यावर भाजपात नेहमीप्रमाणे गोंधळ उडाला. नेहमीप्रमाणे येथेही हिंदू-मुसलमान, राष्ट्रवाद आणि देशद्रोह याच विषयांवर भारतीय जनता पक्षाने प्रचार केला व मते मागितली, पण दिल्लीतील सर्वच थरांतील मतदारांनी हे सर्व विषय ठोकरून लावले व केजरीवाल यांनी पाच वर्षांत जे काम केले त्यावरच मतदान केले. केजरीवाल यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली. असे आपल्या निवडणुकीत सहसा घडत नाही. भावनिक आणि धार्मिक मुद्दय़ांवरच भर दिला जातो. भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे दिल्लीत तेच केले. नागरिकता सुधारणा कायदा, एनआरसी या मुद्दय़ांवर वातावरण तापवले. सीएए म्हणजे नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात आंदोलक बसले व हे फक्त मुसलमानांचे आंदोलन आहे असा प्रचार करून मते मिळवण्याचा प्रयत्न झाला. तो फारसा यशस्वी झाला नाही. दिल्लीकरांनी ‘आप’च्याच पारडय़ात विजयाचे दान टाकले. विधानसभेच्या 70 पैकी तब्बल 60च्या वर जागा आपने जिंकल्या. गेल्या वेळेपेक्षा यावेळी भाजपच्या जागा वाढल्या. मतांची टक्केवारीही थोडी वाढली आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात घसरून त्यांना पुन्हा भोपळाही फोडता आला नाही, हे भाजपसाठी कदाचित ‘दिलासादायक’ असू शकते, परंतु शेवटी केजरीवाल आणि त्यांनी पाच वर्षांत केलेली कामे कथित राष्ट्रवाद, हिंदू-मुसलमान ध्रुवीकरण यांच्या जुमलेबाजीपेक्षा सरस ठरली.

केजरीवाल यांनी केलेल्या कामांच्या जोरावर सत्ता पुन्हा मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली. केजरीवाल यांनी दिल्लीतील शाळांवर मोठे काम केले. सरकारी शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तराचा केला. या शाळा, त्यांची शिक्षण पद्धती जगात आदर्श ठरली. केजरीवाल यांनी आरोग्य व्यवस्थेत मोठी सुधारणा केली. त्यांच्या मोहल्ला क्लिनिक योजनेचा लाभ गोरगरीबांना मिळाला. भ्रष्टाचार शून्यावर आला. केजरीवाल यांचा दिल्ली प्रदेश हा केंद्रशासित असल्याने कायदा सुव्यवस्था, पोलीस, उद्योग हे विषय त्यांच्या अखत्यारीत येत नाहीत. त्याचा त्यांना फायदाच झाला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ बारा वाजले व त्याचे खापर मोदी-शहांवर फोडण्यात ते यशस्वी झाले, पण पाणी आणि वीज बिल माफीचे संपूर्ण श्रेय त्यांनी घेतले. भाजप हिंदू-मुसलमान, पाकिस्तान वगैरे बोंबलत बसले. ”केजरीवाल हे एक नंबरचे आतंकवादी आहेत” असे भाजपने जाहीर केले, पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या ‘आप’चा झाला. ‘आपमतलब्यां’चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळय़ांना साफ केले. केजरीवाल यांचे अभिनंदन!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्तेत आल्यानंतर हिटलरने देखील मोठं स्टेडियम बांधून स्वतःचं नाव दिलं होतं” – जितेंद्र आव्हाड

News Desk

कॉंग्रेस पक्ष दुबळा होत चालला आहे हे स्वीकारायला पाहिजे – कपिल सिब्बल

News Desk

इस्लामिक दहशतवादाविरोधाच्या लढाईत अमेरिका नेहमीच भारतासोबत | ट्रम्प

News Desk