HW News Marathi
महाराष्ट्र

“कमवतात इथे आणि पाठवतात पाकिस्तानला”; नाव न घेता साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची शाहरुखवर टीका

नवी दिल्ली। वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ड्रगच्या प्रकरणावरून शाहरुख आणि बॉलिवूडवर घणाघाती टीका केली आहे. खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनवर मोठे विधान केले आहे. त्यांनी शाहरुख खानचे नाव न घेता तो इथे कमावतो आणि पाकिस्तानात खर्च करतो असे म्हटले आहे. आर्यनला अटक केल्याबद्दलही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भाष्य केले आहे. आता हळूहळू वास्तव बाहेर येत आहे असे त्या म्हणाल्या.

इथे कमावतात पण पाठवतात पाकिस्तानला

आपल्या देशात राहणाऱ्या लोकांपैकी कोणी बेकायदेशीर काम केले तर त्यांना भीती वाटते असे प्रज्ञा सिंह म्हणाल्या. शाहरुखचे नाव न घेता त्यांनी आपल्या देशात राहणारे हे लोक म्हणायचे की ते भारतात सुरक्षित नाहीत असेही म्हटले आहे.खासदार प्रज्ञा सिंह यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानवर जोरदार टीका केली आहे. “जेव्हाही त्याने मदत केली आहे, ती पाकिस्तानची केली आहे. भारताला कधीही मदत केली नाही. ते इथे कमावतात पण पाठवतात पाकिस्तानला. त्यांचे वास्तव समोर येत आहे. बाकी जे शिल्लक आहे ते सुद्धा लवकरच बाहेर येईल. आता देशभक्तांची गरज आहे. फक्त देशभक्तच इथे राहतील,” असे खासदार ठाकूर म्हणाल्या.

बॉलिवूडचे जग ग्लॅमरस आहे

खासदार प्रज्ञा सिंह यांनी ड्रग प्रकरणात बोलताना बॉलिवूडचे जग ग्लॅमरस आहे असे म्हटले आहे. “या लोकांनी ते स्वीकारले आहे. ते जमिनीवरील जीवन स्वीकारत नाहीत. यामुळे त्यांना या गोष्टींची मदत घ्यावी लागते,” असे त्या म्हणाल्या. शाहरुखचा मुलगा आर्यन ड्रग्जमध्ये अडकल्याच्या संदर्भात त्या म्हणाल्या की, “बॉलिवूडच्या जगात ज्यांनी जास्त पैसे कमावले आहेत आणि जे लोक ते पैसे चांगल्या कामात गुंतवत नाहीत त्यांची मुले अशा प्रकारची कामे करतात.”दरम्यान, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपावरून एनसीबीच्या ताब्यात आहे. गुरुवारी आर्यनच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला आज मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. आर्यनच्या वकीलांनी पुन्हा एकदा जामीन याचिका दाखल केली होती. मात्र यावर एनसीबीने ११ ऑक्टोंबर पर्यंत कोठडी मागितली. दरम्यान, न्यायालयाने आरोपींना ९ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करू – चंद्रकांत पाटील

News Desk

वरुण सरदेसाईंच्या सुरक्षेवरुन भाजप-मनसेचा ठाकरे सरकारला टोला

News Desk

राज्यसभेसाठी ‘मविआ’ने दिलेली ‘ही’ ऑफर भाजपने धुडकावली; काय निर्णय घेणार सर्वांचे लक्ष

Aprna