HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरोधात खा डॉ प्रीतम मुंडे आक्रमक!

बीड। बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या आडमुठ्या धोरणाविरोधात हल्लाबोल करत अनेक प्रश्नांवर्ती आवाज उचलला आहे. ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत स्वत:चा दोष दाखवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम राज्य सरकार करतं. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्याचे पाप या राज्य सरकारनं केलं. जर सगळे दोष केंद्राचे असतील तर राज्य चालवण्यासाठीही केंद्राकडे द्या, असा जोरदार टोला प्रीतम मुंडे यांनी लगावलाय. प्रीतम मुंडे आज बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत

त्या पुढे बोलतांना म्हणाल्या की, ‘नाचता येईना, अंगण वाकडं’ असं राज्य सरकारचं काम आहे. नव्या गाड्या, बंगल्यांची डागडुजी करण्यासाठी पैसे आहेत. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत. रोज सकाळी पत्रकारांसमोर विचार मांडायचे आणि राजकीय टिप्पणी करायची असं काम या सरकारचं सुरु आहे. समाजातील कुठलाही वर्ग या सरकारच्य कामगिरीवर समाधानी नाही, असा घणाघात प्रीतम मुंडे यांनी केलाय.

‘बीड रेल्वेला राज्याकडून मदत नाही’

सर्वसामान्य नागरिकांनी या सरकारच्या कामगिरीवर डोळा ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवावी. बीडच्या रेल्वेला राज्य सरकारकडून मदत नाही. केवळ 19 कोटी राज्य सरकारनं दिले. केंद्राने भरपूर मदत केली आहे. राज्य सरकारनं वाटा दिला तर 2024 पर्यंत रेल्वे येईल. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे, अशी माहिती प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.

आज इथं कोण कुणाच्या हातचं बाहुलं

राज्यात लैंगिक अत्याचाराचा मुद्दा गंभीर आहे. बीड जिल्ह्याची मान खाली जात आहे. या सरकारमध्ये दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न अनुत्तरित आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसंच पक्ष म्हणून बेदखल केलं जातं की नाही हे मला माहिती नाही. पण आज इथं कोण कुणाच्या हातचं बाहुलं आहे हे सर्वांना माहिती असल्याचा टोलाही प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना लगावलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न जीएसटीपेक्षा कमी महत्वाचा आहे का? विखे पाटील

News Desk

“इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR बंधनकारक!”

News Desk

खानवडीच्या आदर्श निवासी शाळेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही! – अजित पवार

Aprna