HW News Marathi
महाराष्ट्र

‘बी एच आर घोटाळ्यामुळेच माझ्या मागे ईडी ची कारवाई’-एकनाथराव खडसे

जळगाव। पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील भूखंड खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊस व घरावर ईडीने जप्तीची कारवाई केल्याची केवळ अफवा आहे, असे स्पष्ट करतानाच एकनाथ खडसे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत, अशी माहिती खडसे यांच्या कन्या व जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड. रोहिणी खडसे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली होती. भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी कडून खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. आणि आता त्याच संदर्भात खडसेंनी मोठं वक्तव्य केलंय.

ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे

आधी ईडीने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील खडसेंचे फार्म हाऊस व निवासस्थान सील केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. खडसे यांना ईडीने ताब्यात घेतल्याचीही वार्ता पसरली होती. याबाबत खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी माहिती दिली असून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. या बाबी निव्वळ अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही. शिवाय कोणतीही जप्तीची कारवाई झालेली नाही किंवा नोटीसही आलेली नाही, अशी माहिती अॅड. रोहिणी खडसे यांनी दिली होती. या अनुषंगाने एकनाथ खडसे यांनी आज बोदवड येथील कार्यक्रमात हजर राहून ईडी बाबत भाष्य केले आहे.

खडसे यांच्या नातेवाईकांनी 3.75 कोटी रुपयांना जमीन खरेदी केली

हा खटला 28 एप्रिल 2016 रोजी हवेली तालुक्यातील भोसरी गावात जमीन खरेदी करण्याशी संबंधित आहे. खडसे यांच्या नातेवाईकांनी 3.75 कोटी रुपयांना जमीन खरेदी केली. मात्र, प्रचलित बाजार दराच्या नुसार या जमिनिची किंमत 31 कोटी रुपयांच्या घरात आहे.ईडीचा खटला महाराष्ट्र भ्रष्टाचारविरोधी ब्युरोने (एसीबी) 2017 मध्ये खडसे यांच्या विरोधात केलेल्या पहिल्या माहिती अहवालावर आधारित आहे. एसीबीने नंतर हे प्रकरण बंद केले, परंतु ईडीने जमीन व्यवहारातील कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी सुरू ठेवली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जिल्हाधिकारी कोण असावा हे मी ठरवत नाही’, नवाब मालिकांचं स्पष्टीकरण

News Desk

उद्योग व स्वयंरोजगाराला अर्थसहाय्याद्वारे गरजू घटकांना सक्षम बनवावे! – धनंजय मुंडे

News Desk

७ मार्चला मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा

News Desk