HW News Marathi
देश / विदेश

अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ED कडून अटक

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पलांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. त्यानंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. मनी लॉण्ड्रिग प्रकरणात ईडीने दोघांविरोधात ही कारवाई केली आहे.(२५जूनला) रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आणि आज (26 जून) सकाळी अकरा वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात आलंय.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण ?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यामुळे राज्यभर बंदची हाक

News Desk

‘महाराष्ट्र सरकार राज्याच्या डीजीपी दावेदारांबाबत यूपीएससीच्या निर्णयाची का वाट पाहत आहे?’

News Desk

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन !

News Desk