HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून चौकशी…

जालना। शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील राहत्या घरी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने (26 नोव्हेंबर) सकाळी छापा टाकला आहे. आणि यासोबतच अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने तब्बल 18 तास ही चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबादसह जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर ईडीने अर्जुन खोतकरांच्या घरावर हा छापा टाकला आहे.

छापेमारी सत्र सुरूच

राज्यातील सत्ताधारी पक्षातील लोकांच्या आणि नेत्यांच्या घरी आणि साखर कारखान्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात येत आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांवर केंद्रीय संस्थांकडून छापेमारी करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची तसेच त्यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या मुलाचीही ईडीकडून चौकशी होणार आहे. राज्यात औरंगाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत ईडीकडून छापेमारी सुरुच आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती येथेही झडती

इडीचे अधिकारी अर्जुन खोतकर यांच्या घरी पोहोचल्यावर घराचा दरवाजा आतून बंद करण्यात आला. सकाळी साडेआठ वाजलेपासून चौकशी सुरु झाली. या वेळी अर्जुन खोतकर हे घरीच होते. ईडीने खोतकर यांच्या निवासस्थानासोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती येथेही झडती घेतली. किरीट सोमय्या यांनी औरंगाबाद येथील रामनगर सहकारी साखर कारखान्यात उद्योजकांच्या माध्यमातून आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ईडीच्या कारवाई विरोधात अर्जुन खोतकर प्रसारमाध्यमांना माहिती देणार असल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लिलाव बंद होऊन आता डेपोतूनच प्रती ब्रास वाळू ६०० रुपयांत मिळणार! – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध ?, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

News Desk

राज्य सरकारला दुष्काळाच्या माहितीसाठी अजून किती वेळ हवा? , न्यायालयाचे ताशेरे

News Desk