HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीची धाड

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईकयांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीच्या पथकाने आज (२४ नोव्हेंबर) सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर १० ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे.

प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईचं भाजपनं समर्थन केलं आहे.

जर त्यांनी बेमानी मनी लाँड्रिंग केलं असेल, तर त्यांच्यावर कारवाई झाली असेल. जर कोणीतरी खोटी कामंकरत असेल तरक त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. प्रताप सरनाईकांबाबत मी अशा प्रकारच्या काही गोष्टी ऐकल्या होत्या आणि म्हणून जर मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई नको, तर ही चुकीची लोकशाही होणार म्हणून लोकशाहीत फुल होमवर्कसह कारवाई होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाण्याच्या वाढत्या मागणीनुसार मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी! – अजित पवार

News Desk

ताईसाहेब,मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यापेक्षा मोदींना लिहा,धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा !

News Desk

भोकर तालुक्यातील शेतकऱ्याची धावत्या रेल्वेखाली आत्महत्त्या   

News Desk