HW News Marathi
महाराष्ट्र

प्रताप सरनाईकांना ईडीने पुन्हा एकदा बजावला समन्स

मुंबई | टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत चौकशीच्या फैऱ्यात अडकलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. सोमवारी (१४ डिसेंबर) प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी हजेरी राहण्याचे आदेश दिले आहेत. आधी दोन दिवसांपूर्वीही प्रताप सरनाईकांची ईडीने तब्बल सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्रताप सरनाईक यांना ईडीने समन्स बजावला आहे. यात ईडीने प्रताप सरनाईक यांना येत्या सोमवारी (14 डिसेंबर) चौकशीसाठी हजर राहा, असे आदेश दिले आहेत. पण विहंग सरनाईक यांना ईडीने समन्स बजावलेला नाही.दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेनुसार ते ईडीच्या कार्यालयात गुरूवारी ( १० डिसेंबर) सकाळी ११ वाजता हजर झाले. यावेळी त्यांची सतत सहा तास चौकशी चालली. ही चौकशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालली होती.

काय आहे प्रकरण?

ईडीने २४ नोव्हेंबरला प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलसह विविध १० ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते.

ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी या दोघांमध्ये तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे काही रामराज्य आहे का?,” संजय राऊत मोदी सरकारवर संतापले

News Desk

जवाहर एज्युकेशन सोसायटीत संचालक मंडळावरून धनंजय मुंडे-पंकजा मुंडेमध्ये संघर्ष

Aprna

महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 3 रुपये 50 पैशांची वाढ

Aprna