HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांचा भाऊ कप्तान मलिकांना ED ने बजावला समन्स

मुंबई | दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केले असून त्यांना ३ मार्चपर्यंत सत्र न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावणी आहे. यानंतर मलिकाचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने समन्स बजावला आहे, ही माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिले आहे. कप्तान मलिक यांना आज (२४ फेब्रुवारी) देखील दाऊत इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स दिला आहे. परंतु, कप्तान मलिकांनी यासंबंधित माहिती विचारल्यावर त्यांना ईडी समन्स पाठवल्याचे दावा फेटाळून लावला आहे.

यासंदर्भात कप्तान मलिकांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “मलिक कुटुंबाना कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबणारे नाही. नवाब मलिक हे माझ्यासाठी वडिलांप्रमाणे आहे. यामुळे ते जे काही सांगितली त्याप्रमाणे आम्ही तसे करणार आहोत. मला ईडीकडून कोणतेही नोटीस आले नाही, ” असे ते म्हणाले. तसेच ईडीने दाऊतचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली आहे. इक्बाल कासरकला देखील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी १८ फेब्रुवारीपासून तो ईडीच्या कोठडीत आहे. आज (२४ फेब्रुवारी) ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. इक्बाल कासकरला न्यायालयात नेहण्यापूर्वी त्यांची मेडिकल चेकअप करण्यासाठी रुग्णालयात घेऊन गेले आहे.

मलिकांच्या निवसस्थानी काल (२३ फेब्रुवारी) ईडीचे अधिकारी पहाटे ४. ३० वाजताच्या सुमारा पोहोचले. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत सीआरपीएफचे जवान देखील मलिकांच्या निवासस्थान गेले होते. मलिकांना ईडीच्या कार्यलयात मलिकांना काल सकाळी ७ वाजताच्या सुमारात त्यांच्या निवासस्थानहून घेऊन केले. यानंतर मलिकांची ईडीच्या कार्यालयात ७.४५ वाजल्यापासून सलग ८ तास चौकशी केली. मग, मलिकांना मेडिकल चेकअपसाठी जे. जे. रुग्णालयात नेहण्यात आले. मलिकांची सत्र न्यायालयात दोन्ही बाजुने युक्तीवाद झाल्यानंतर त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयाच्या जवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुकेश अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का!

News Desk

पुण्याच्या मल्टिप्लेक्स मॅनेजरला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

News Desk

…अन् पंकजा मुंडे ऊसाच्या फडात कामगार महिलांसोबत पोटभर जेवल्या

News Desk