HW News Marathi
महाराष्ट्र

सतीश उकेंना घेऊन ईडीचे पथक मुंबईत दाखल

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काल (गुरुवार, ३१ मार्च) छापा टाकला. काल पहाटेच ईडीचे अधिकारी त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी झडती घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र, हा छापा कोणत्या प्रकरणात लागला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ईडीने जवळपास पाच तास त्यांच्या घराची झाडझडती घेतल्यानंतर त्यांना नागपूर येथे चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आज (१ एप्रिल) ईडीने सतीश उके यांना अटक करून मुंबईला रवाना केले आहे.

खरंतर वकील उके हे वारंवार भाजप नेत्यांच्या विरोधात आवाज उठवत असल्यामुळे त्यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई झाली असल्याचा आरोप उके कुटुंबियांकडून केला जात आहे. सतीश उके यांनीच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई केली असल्याचा आरोप होत आहे. तर अधिका-यांनी असा दावा केला आहे की सतीश उके आणि त्यांचे बंधु प्रदीप उके यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला काही काळापूर्वी नागपुरात सुमारे 1.5 एकर जमीन खरेदीशी संबंधित आहे आणि जमीन खरेदीसाठी वापरलेली कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप आहे. खरेदी केलेली जमीन भावांच्या नावावर असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरातील पार्वती नगर भागातील सतीश उके यांच्या घराची झडती घेण्यात आली आणि नंतर त्यांना व त्यांच्या भावाला शहरातील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ईडीनं त्यांच्या घरावर धाड टाकली होती. पाच तास चौकशी झाल्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांच्या घरातून कोणतेही कागदपत्र नाही, तर एक लॅपटॉप आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले, असं उके कुटुंबीयांनी सांगितलं आहे. तर त्यानंतर आज वकील उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उकेंना मुंबईत नेण्यात आलं आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

News Desk

“जर ती वेळ आली तर विचार करू”,मनसे सोबतच्या युतीवर फडणवीसांचं महत्त्वपूर्ण विधान..!

News Desk

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात

News Desk