HW News Marathi
महाराष्ट्र

“२४ तासात चौकशीसाठी हजर राहा, नाहीतर घरी येऊन चौकशी करू”, देशमुखांना ईडीचं उत्तर

मुंबई । ईडीच्या कचाट्यात सापडलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स बजावून आज (२९जून) सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, अनिल देशमुख यांनी वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. यासंदर्भात त्यांनी ईडीला पत्र देखील लिहिलं होत दरम्यान, या पत्राला ईडीने उत्तर देत २४ तासांत ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

देशमुख यांनी वकिलामार्फत वय, तसंच कोविड-१९ चा धोका, सरकार कडून लावण्यात आलेले निर्बंध या सर्व गोष्टींचा विचार करून मी ईडी कार्यलयात हजर राहू शकत नाही, असं ईडीला सांगितलं. जमल्यास माझा जबाब ऑडिओ, व्हिडिओमार्फत रेकॉर्ड करण्यात यावा, अशी विनंती करणारं पत्र ईडीला पाठवलं होतं.

देशमुख यांच्या पत्रानंतर ईडीने त्यांना नव्याने निरोप पाठवला आहे. चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात २४ तासांत हजर राहा, अन्यथा घरी येऊन चौकशी करु, असं ईडीने म्हटलं आहे. त्यामुळे आता ईडीच्या या आक्रमक भूमिकेमुळे अनिल देशमुख कोणती भूमिका घेतात याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अनिल देशमुख यांनी काय विनंती केली?

ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना आज चौकशीला हजर राहावे लागणार होते. परंतु, अनिल देशमुख यांनी वकिलांचा सल्ला घेऊन पुढील पाऊल टाकले आहे. त्यांनी ईडीला विनंती करणारे एक पत्र पाठवले आहे. ‘ईडीने यापूर्वी जी माहिती हवी त्यास सहकार्य केले, माझ्या कुंटुब सदस्य ही मदत करत आहेत. त्यामुळे ईडी यंत्रणेने माझ्या विनंतीचा विचार करावा’ अशी विनंतीच अनिल देशमुख यांनी केली. कोविड काळात सोशल डिस्टसिंग आणि इतर परिस्थितीत आणि त्यात वय ७२ असल्यामुळे स्वत: ईडी कार्यालय उपस्थितीत न राहण्यासाठी विनंती देशमुखांनी या पत्रातून केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार मंत्रालयात येतात,उद्धव ठाकरे कधी येणार ?

News Desk

भगतसिंह कोश्यारी आज देहरादूनकडे प्रस्थान करणार

Aprna

प्रकल्पांना तात्काळ मंजुरी देईन…

swarit