HW News Marathi
महाराष्ट्र

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?, निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई | तौक्ते चक्रीवादळानंतर मुंबईत अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं. यातच मुंबईतील वरळी परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. वरळी कोळीवाडा पुर्ण भरला होता. याचीच दखल घेत वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

वरळीतील साठलेल्या पाण्याचा व्हिडिओ ट्विटर वर शेअर करत भाजप नेते निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना घेरले आहे. वरळी हा आदित्य ठाकरेंचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे आता वरळीतील पाणीसाठ्याकडे बोट दाखवून आदित्य ठाकरेंना जाब विचारला जात आहे. ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे? असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

काय आहे निलेश राणे यांचे ट्विट?

“हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे??? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली??? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही.” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

मुंबईतील परिस्थिती

मुंबईत एकूण पाच ठिकाणी घरे पडणे आणि भिंती खचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या घटनांमध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. मुंबईत जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. मुंबईच्या अरबी समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने जाणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वरळी-वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा रद्द

News Desk

मराठा आरक्षणावर सत्ताधारी आणि विरोधी एकत्र, राजकारण करणार नाही, फडणवीसांचे आश्वासन!

News Desk

विधानसभेला एमआयएम स्वबळावर लढणार, ‘वंचित’मध्ये उभी फूट

News Desk