पुणे। पुण्यात एका कबड्डीपट्टू १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बिबेवाडीमध्ये घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच या मुलीवर कोयत्याने वार करुन तिचा खून केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने तिची हत्या केली. समोर मुलीची हत्या होत असताना छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती. तर अन्य नागरिकांनी घटनास्थळारुन थेट पळ काढला.
बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती
मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होते. हत्येआधी मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. आरोपी हा अत्यंत संतापाने मुलीकडे आला होता. मुलगी कबड्डी खेळण्यात मग्न होती. मात्र आरोपीने मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. थेट मानेवर वार केल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. आरोपीने अत्यंत अमानुषपणे मुलीचा खून केला. तसेच या मुलीचे डोके धडापासून वेगळे करण्याचा प्रयत्न ओरपींचा होता की काय ? अशी शंका अपस्थित केली जात आहे.
एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याची शंका
मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीने मुलीचा खून केला त्याच्याकडे कोयता तसेच पिस्तुलही होते. मात्र, खून करताना रागाच्या भरात त्याने कोयत्याचा उपयोग केला. तर खून केल्यानंतर पिस्तूल घटनास्थळीच फेकून देत पळ काढला. दरम्यान, या अत्यंत भीषण खुनामुळे बिबवेवाडी तसेच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेसह बिबवेवाडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.